चंद्रभागेच्या किनारी वारकरी न्हाहली, आपल्या पाप -पुण्य तुन मोकळी जाहली, विठूच्या दर्शनाने त्यांना पंढरी पावली, सगळीकडे एकच जयघोष माझा विठू माऊली... सगळ्यांवर आहे तुझी छत्र छाया, तुही लावलीस तुझ्या लेकरांवर माया, मस्तक ठेवितो मी तुझ्या पाया, तूच आमचा माय-बाप,तूच आमचा राया... ज्ञानेश्वरांना दिलास विद्येचा भंडार, तुकारामांना घडवलेस देऊन अंकुशाचा मार, इतरांनाही दिलास तू आयुष्याचा सार, या मातीतून घडलेल्या शरीराचा, तूच आहेस कुंभार... गजर होत आहे तुझ्या अभंगाचा, लोकांवरही प्रभाव आहे तुझ्या भारुडांचा, स्वामी आहेस तू तिन्ही युगांचा, उठून दिसतोस तू सावळ्या रंगाचा... पालखी सोबत निघते सगळ्यांची वारी,🚩 घोड्याची पण असते सोबत सवारी,🐎 गोल रिंगणाची तर बातच आहे न्यारी,⭕ सगळ्यांच्या मुखात फक्त पांडुरंग हरी...🙏 माझा विठू माऊली #विज #VJ #माऊली #आषाढी #विठ्ठल #हरी #शब्द_लहरी