Nojoto: Largest Storytelling Platform

शरीर उघडे पडले नागडे झाले तरीही झाकली मूठ सव्वा ल

शरीर उघडे पडले नागडे झाले 
तरीही झाकली मूठ सव्वा लाखाची 
एका खोलीत त्या दोघात काय घडतंय 
जिथे आधीच मिटते भूक शरीराची...

आदर्श म्हणून रितिरिवाजात लग्न होतात 
पण दगा मिळते हल्ली प्रत्येकाला त्यात चूक कोणाची 
हातमेले झाले शरीर इथे बहुतेकांचे आधीच 
भावना ही मेल्या पहिल्या रात्रीच्या त्यात चूक कोणाची...

आधी आणि नंतर ही लपूनछपून सगळंच होतंय 
त्या प्रणय क्रिडेची आस राहिली कोणाची 
कित्येक सुहागरात्री आता रोज होतात 
मग कोणाला असणार वाट त्या भावनिक पहिल्या रात्रीची...

कठीण झालं हल्ली सती सावित्री मिळणं 
अनं कोणाला गरज उरली प्रेम करणाऱ्या पतीची 
प्रेम करून तर फसवणूक केली जाते उघड्या डोळ्यांनी 
म्हणून तर लग्नाला आवश्यकता पडते फक्त संपत्तीची...

इतिहासजमा होतंय सगळं आता इथे 
जिथे आस होती एकव्रता पती पत्नीची 
ती भावनाच मरत जात आहे जी असायची पहिल्या रात्रीला 
आता तर फक्त Formality उरली समाजासमोर लग्नाची...

खरं तर रोज बलात्कार होतात इथे 
अनं दखल घेतली जाते फक्त उघड्या पडलेल्या बातमीची 
आधी लग्नानंतर व्हायचं प्रेम आणि प्रणय मर्यादेत राहून 
आता तर फक्त भूक मिटवली जात आहे प्रेमाच्या नावावर शरीराची....

म्हणून प्रेम केलंत तर लग्न ही व्हायला हवं एकाशीच 
मग कशाला फसगत करावी कोणाची 
पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही हे गरजेचं असतं 
कारण, ईच्छा च उरली ना आता अनं भावना त्या पहिल्या स्पर्शाची...

म्हणून नशिबाला आणि दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा 
हिम्मत करा खरं ते जगासमोर बोलण्याची 
दुसऱ्याला फसवून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा 
कदर करा हो आतातरी मिळणाऱ्या खऱ्या प्रेमाची...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #silhouette  sad shayari very sad love quotes in hindi sad status in hindi Extraterrestrial life sad status