Nojoto: Largest Storytelling Platform

❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, प

 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा
💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛

स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार उघडताच सावंत काकू एकदम अंगावर ओरडल्या काय गं लवकर दरवाजा उघडता येत नाही का उगाच जीव टांगणीला लावतेस, तसे स्मिताला हसू आलं, हास मला म्हातारीला सावंत काकू म्हणजे स्मिताला अगदी आई सारख्या तिच्या घर मालकीण होत्या.
स्मिता आणि निखील दोघेही विदर्भातले पण नौकरी निमित्त ते कोकणात रहात होते, त्यांना एक मुलगी होती ती पाच वर्षांची, आता लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती, मुलीला लहानपणापासून आजी आजोबांची खूप सवय असल्याने ती स्मिताच्या माहेरीच होती, माहेर आणि सासर नागपूर पण सासरच्या मंडळींना मुलाचा हव्यास त्यामुळे छोट्या निधीला कधी त्यांचे प्रेम माहितच नव्हते,आणि हेच विचार निखील रावांचे देखील असल्या कारणाने त्यांना मुलगी  डोळ्यासमोर पण नको असायची.

कितीही केलं तरी आईच ती तिला निधीची फार आठवण यायची पण वडीलांच्या वागण्याचा त्रास होवू नये म्हणून स्मिता तिला सोबत आणण्याचा विचारच करू शकत नव्हती, आज जग एवढं पूढे गेलं आहे पण कसा गं तुझा नवरा एवढा निर्दयी, किती दिवस झाले असं विचारताच स्मिता रडू लागली काकू चार महिने होतं अाले, या वेळी तुम्ही सांगितलं होतं तसच केलं पण जे करायचं तेच केलं त्यांनी मी खूप प्रेमाने समजावलं पण मारलं मला,म्हणाले बाकी काहीही माग तुझ्या पायाशी जग आणून ठेवेन पण आता परत मुलगी जन्माला घातली तर तुलाच मारून टाकेन.

sandyjournalist7382

sandy

New Creator