गणरायाचे आगमन येई आनंदाला उधाण होई दुःखाचे निराकरण सर्व आनंदी भक्तगण नमस्कार मंडळी, आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा करणार आहोत. या अंतर्गत रोज एक शब्द (देवतेचं नाव) आपणास दिला जाईल. त्या शब्दाच्या आधारावर आपणास अभंग रचना लिहायची आहे. दहा दिवस हा उपक्रम चालेल व अनंत चतुर्दशीला याची सांगता होईल. चला तर गणरायापासून सुरुवात करू या... आजचा शब्द आहे... गणपती, गणराया, गजानन गणेश....अशा गणपतीच्या कोणत्याही नावापासून अभंग लिहायचा आहे...!