Nojoto: Largest Storytelling Platform

पुलाखालचा ( फ्लाय ओव्हर खालचा) रस्ता.. परवा करिरोड

 पुलाखालचा ( फ्लाय ओव्हर खालचा) रस्ता..
परवा करिरोडला गेलो होतो, पूर्वी भारतमाता समोरून भरधाव वाहणाऱ्या जुन्या रस्त्यावर आता फ्लाय ओव्हर आरूढ झालाय. त्यामुळे त्या जुन्या रस्त्याचं महत्त्व अचानक कमी झाल्यासारखं वाटलं..फार बिचारा वाटला तो रस्ता मला.
माणसाचं देखील असंच असतं..प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी सहभागी झालेल्या एखाद्याला, त्या महत्वाच्या जागेवरून अचानक अशा जागी टाकलं जातं, जिथे तुमच्या अस्तित्वाची दखलही कुणी घेत नाही. मग फक्त दूरवर चाललेली वर्दळ पहात राहायचं. शांतपणे ☺️ शैलेश हिंदळेकर