Nojoto: Largest Storytelling Platform

*°श्रावण मनभावन°* विहरला हिरवा श्रावण ऋतू हा मन

*°श्रावण मनभावन°* 

विहरला हिरवा श्रावण
ऋतू हा मन मनभावन ll धृ ll

शुभ्र शुभ्र धारा बरसती 
शामल ते मेघ घनगर्द 
होवूनी उदार भरदार 
भिजली वनराई नी किर्द 
फुलवितो जणू वृंदावन...

कधी पाऊस नी कधी ऊन
चमके मोती ऊन भिजत 
मोती दिपती मोती विझती 
सप्तरंगात ते उजळत 
करताहे जणू समर्पण...

हवा धुंद हवा कुंद ओली 
श्वासात भासतो नवागंध 
सजणा साजणी ती प्रणयी 
झाली पहा कशी धुंद धुंद
तयांनाही लाजला दर्पण...

तन मन भिजवी श्रावण 
नखशिखांत फुले हिरवा 
नभी इंद्रधनू बहरीत  
येतो येतो श्रावण शिरवा 
जणू झाला तो चितपावन...

किर्द : लागवड केलेली जमीन.
शिरवा : सर, थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस. 
चितपावन : पृथ्वीला पवित्र करणारे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
धामणी, ता. आंबेगाव जि. पुणे
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav •श्रावण मन मनभावन•
*°श्रावण मनभावन°* 

विहरला हिरवा श्रावण
ऋतू हा मन मनभावन ll धृ ll

शुभ्र शुभ्र धारा बरसती 
शामल ते मेघ घनगर्द 
होवूनी उदार भरदार 
भिजली वनराई नी किर्द 
फुलवितो जणू वृंदावन...

कधी पाऊस नी कधी ऊन
चमके मोती ऊन भिजत 
मोती दिपती मोती विझती 
सप्तरंगात ते उजळत 
करताहे जणू समर्पण...

हवा धुंद हवा कुंद ओली 
श्वासात भासतो नवागंध 
सजणा साजणी ती प्रणयी 
झाली पहा कशी धुंद धुंद
तयांनाही लाजला दर्पण...

तन मन भिजवी श्रावण 
नखशिखांत फुले हिरवा 
नभी इंद्रधनू बहरीत  
येतो येतो श्रावण शिरवा 
जणू झाला तो चितपावन...

किर्द : लागवड केलेली जमीन.
शिरवा : सर, थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस. 
चितपावन : पृथ्वीला पवित्र करणारे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
धामणी, ता. आंबेगाव जि. पुणे
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav •श्रावण मन मनभावन•