माझे बाबा❤️... आमच्या अस्थित्वाची सुरवातच मुळात तुम्ही... आणि तरीही सुरूवात कशी आणि कुठून करायची हे सुचत नाही.. लेखणीतून तुमच्याशी बोलते कारण तुमच्याशी आम्ही तिघेही कधी मनमोकळे पणानी बोललोच नाही ..आता ही हिम्मत होत नाही बाबा...भीती पोटी नाही तर आदरापोटी..तुम्ही केलेला अपार कस्टापोटी..सहन केलेल्या परिस्थिती पोटी.. बाबा we love u❤️ आम्हला आजही नवल वाटतो तुमचा असे कसे हो बाबा तुम्ही..*सुखं आणि दुःख* दोन्ही तुम्हाला सारखेच कसे..म्हणजे कुठल्या गोष्टीचा अती आनंद आणि अती दुःख कधीच आम्हाला दिसल नाही की तुम्ही दिसू दिलं नाही???हे तेव्हा जरी कळत नसली तरी आत्ता त्याची पुरेपूर जाणीव आहे होतंय.. मला आजही तुमचा तो चेहेरा आठवतो जेव्हा तुम्ही अदानीला कामाला जायचे *सायकलवरून* सकाळी गेले ते रात्री च परतलेले 8 वाजेला..तेव्हा तो घामाघूम झालेले दमलेले बाबा😢 तेही फक्त आमच्या सुखासाठी.... अजून एका गोष्टीचं नवल वाटतं....की कुणी दोन-दोन वर्ष स्वतःला काहीच कसं घेऊ (खेरदी) करू शकत नाही...मग ते साधं 50 रुपयाचं चप्पल का होईना ... तुम्हाला कधीच वाटलं नसेल का एखादा नवीन शर्ट घ्यावा की चप्पल घ्यावी. वाटलं ही असेल पण परिस्थितीचे ओझे नेहमी तुमच्या खांद्यावर... .तुमच्या सारखे तुम्हीच जगू शकता बाबा... खंत एकच की तुम्ही स्वतःसाठी कधी जगलेच नाही... स्वतःचे स्वप्न उशाशी घेऊन आमच्या स्वाप्नासाठी जगले.. तुम्हाला नेहमीच बसून काम करण्याची सोय करून घ्यायची होती स्वतःसाठी(गिरणी आणि किराण्याच दुकान हे खूप वाटत होत तुम्हाला)..पण आम्ही सावलीत बसून काम करावं ह्याला प्राध्यान्य दिलं स्वतःच्या स्वप्नांना उन्हात ठेऊन..तुमच्या सारखे तुम्हीच... आमच्या साठी जगता जगता स्वतःसाठी कधी जगलेच नाही इतरही बाबा बघितले आम्ही पण तुमच्या सारखे कुणी दिसलेच नाही... -कल्याणी ढबाले #माझेबाबा #loveusomuch बाबा#for everything u did and doing for us....