तुला जो दिसतो.. तुला जो जाणवतो.. तू जगाला जो दाखवतो.. तू जाणून जो घेतो.. तुला जावा असा जो वाटतो.. असे कितीसे थर.. थरावर.. वरवर वाटत गेले... वाटलेले सत्य की.. असत्य सत्य..? कळले?की कळूनही... कोणासाठी कुठेतरी.. कसे कसे कापत गेले? गेले की गेल्यासारखे.. वाटून ही.. वहावत.. पुन्हा पुन्हा..तेथेच तुझ्याच तीरावर ती.. फिरत फिरत तुझ्यामधेच..कोरत गेले थर????