अर्धी रात्र उलटून गेली.. पण डोळे अजून मिटले नाहीत.....डोकावून पहिले बाहेर तर चांदण्यांचा प्रकाशही जागाच होता... धुंद मंद वारा बाहेर ये सांगत होता... थोडी दचकत.. दबकत चालू लागले... सुंदर असे तराने काहीशे वाजू लागले.. काहीतरी रुणझुण रुणझुण चालू होती हवेच्या तरंगात... एक चाहूल मला स्वतःकडे खेचू लागली.. पहाते तर काय ते एक स्वप्नचं जणू.. पहाटेचं शूभ्र वारू माझ्यासमोर उभे होते.. स्वप्न नाही मी सत्य आहे हे सांगत होते.. सत्य आहे हे सांगत होते... काही स्वप्ने प्रत्यक्ष सत्यात उतरली कि खूप आनंद होतो..