Nojoto: Largest Storytelling Platform

धारा पावसाच्या धारा वेचू चला गारा धुक्याचा पसारा

धारा

पावसाच्या धारा
वेचू चला गारा
धुक्याचा पसारा
त्यात घोंगावतो वारा

झाला गवताचा चारा
ढग वाजवी नगारा
दिसे न सूर्यचंद्रतारा
झुळूझुळू वाहे झरा

ढग चालती तरातरा
पाणी वाहे भराभरा
एका पायावर मोरा
तू फुलव पिसारा धारा
धारा

पावसाच्या धारा
वेचू चला गारा
धुक्याचा पसारा
त्यात घोंगावतो वारा

झाला गवताचा चारा
ढग वाजवी नगारा
दिसे न सूर्यचंद्रतारा
झुळूझुळू वाहे झरा

ढग चालती तरातरा
पाणी वाहे भराभरा
एका पायावर मोरा
तू फुलव पिसारा धारा