व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा, आयुष्याचे भक्त व्हा! दुःख सारे सांगून सहहृदयीस मुक्त व्हा रे मुक्त व्हा! निराशेच्या झळमटास आशेच्या झाडूने झाडून अंतर्बाह्य स्वछ व्हा. स्वछ व्हा रे,स्वछ व्हा! 'मी' पणाच्या तोडून भिंती शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा. सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा! अबोला सोडून देऊन भावनांना वाट करा. दुःखास जलसमाधी देऊन आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा. स्वार व्हा रे,स्वार व्हा! आयुष्याचे मोल जाणून वाईट व्यसनाच्या अधीन असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा. सावध व्हा रे,सावध व्हा! सदैव काळजीत रमणाऱ्यांनो, विसरून ताण सारा विरक्त व्हा. विरक्त व्हा रे, विरक्त व्हा! अंधाराची सोडून गुलामी प्रकाशाचे भक्त व्हा. भक्त व्हा रे,भक्त व्हा! कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा! असक्तीचे पाश झुगारून मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!