Nojoto: Largest Storytelling Platform

#मोल आयुष्याचे.. कोण कसा जगतो हेच कसे कळेना नभांगण

#मोल आयुष्याचे..
कोण कसा जगतो हेच कसे कळेना नभांगणीचे चंद्रसुर्यास ये जा सुटेना
काल खुशाली कळकळीत कळली आज मशाली पेट घेवूनीच पेटली
सुभाग्या मृत्यू तिरडीचे मोल छळेना अनंताचे अनंत बुडबुडे अंती फूटती
क्रोधाग्नीने समर सागर ही आटती निराधार मानवजातीस मोक्ष जुळेना
अहंकाराचा माडीबंगला असे डौलदार अंगावरती मखमली काटेरी ईजार
सरणावरती लाकुड फाटाही आता विझेना अभाग्याची चालली वाकळ तिरडी
मागून कुत्री संगती डौलच वेगळी ना वाजंत्री ना आक्रोश शवाला शिवेना
कोण कुणाचा वाली पैसा खुशाली
नदीतील मासा असे राजासम मिजास तयाची तिथली
पण सदा तयाच्या घषास कोरड पडलेली
जगी कुणाचे कोण होती हा प्रश्न मिटेना कुणाचा कसा डाव मांडते नियती
अजब हे मज पडलेले कोडे सुटेना
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #Save