Nojoto: Largest Storytelling Platform

रंगीत भात कांता, आज तीन वर्षाच्या पोरीला घेउनच का

रंगीत भात

कांता, आज तीन वर्षाच्या पोरीला घेउनच कामावर आलेली...  बाईसाहेब दसऱ्याचं  धुनं काढनार त्यात उगा परत घरी यायला उशीर व्हायचा ...नवरा.. पोटात दारु गेली की सुद राहत नाही तिथं चिमुकल्या पोरीकडं कुठणं ध्यान देणार.. या काळजी पायी ती आधी मधी शेजारच्या आज्जीकडं पोरीला ठेवायची.. पण रोज रोज कुठं जमायचं.. म्हणून पोरीला सोबत आणलेलं .. धुनी-भांडी..कपडालत्ता....पडदे.. ब्ल्ँकेट असं काही बाही करत दसरा काढणं चालूच  होतं..  हाॕलमध्ये बाईसाहेबाच्या छोटया  पोराबरोबर चिमुकली पोर खेळत होती...  पोराच्या हातात 'चकली' पाहुन पोरीला भुक लागली... कांतानं पिशवीतला छोटा डब्बा उघडुन तीच्या पुढ्यात ठेवला... डब्यातला 'रंगीत भात' पाहुन पोराचे डोळे दिपले... पोरगं रडतच आईला जाऊन बिलगलं.. त्यालाही तसा रंगीत भात हवा होता... बाईसाहेबांनी आश्चर्याने कांताकडे पहात विचारलं "कसला गं रंगीत भात..?" कांतानं शरमेनं खाली मान घातली... त्या नंतर कांता त्या घरी कधीच कामाला गेली नाही.. पुढे बऱ्याच दिवसांनी बाईसाहेबाला, कांता एका लग्नात  अक्षता म्हणून  फेकलेले 'रंगीत तांदुळ' ओटीत जमा करताना  दिसली होती.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात

#LookingDeep