जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं हे मन अवघे प्रेमाने तुडूंब भरून येतं प्रेम मनाच्या कप्प्याकप्प्यातून झिरपतं हृदयाच्या अंगणात ऋतुवसंत फुलवतं वळिवाचा पाऊस बरसल्यागत वाटतं दृष्टीपथात सारंकाही हिरवंगार दिसतं जणू आपल्यासाठीच सृष्टीचा फुलोरा स्वागतासाठी आतूर आहे असं वाटतं पाहावे तिकडे माझ्या प्रियकराचा थाट ते आभाळही प्रेमाने वेढल्यागत दिसतं चांदण्यांनी मन उजळतं दिवसाकाठी निशेच्या सुरमयी गंधात मिसळून जातं वाटतं पुन्हःपुन्हा जगावे आभाळाएवढे कण होऊन रानोमाळ दरवळावं वाटतं सैरभैर होतात भावना, सैराट होतं मन थांबतंही कधीकधी, कधी नुसतं पळतं सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल. चला तर मग आज तेच लिहा प्रेमाने प्रेमाबद्दल.