आपल्याला काय त्याचे? जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही आपल्याला काय त्याचे? कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो आपल्याला काय त्याचे? जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे आपल्याला काय त्याचे? आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे आपल्याला काय त्याचे? उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे आपल्याला काय त्याचे? आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे आपल्याला काय त्याचे? द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?