❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण नाही. बररं! ती कशी असेल, याचा थांगपत्ताही लागत नव्हता. तिला आईवडिल नव्हते. म्हणून तिचा लहानपणापासून तिचा सांभाळ तिच्या काकाकाकूंनी केला. तिला नृत्याची खूप आवड होती. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, हो मला चांगलाच आठवतोय तो दिवस. जेव्हा तिने काँलेजमध्ये असताना एका साइलेंट गाण्यावर कथकली डान्स केलेला. तेव्हा किती जीवाचं पाणीपाणी करून तिने डान्सची प्रँक्टिस केलेली. मी सुद्धा तेव्हा पाहतच राहिलो ते ! त्यात तिच्या पैंजणीची एक जोड तुटलेली आणि मग तिचा डान्स संपलेला. त्याच दिवशी माझी नि तिची भेट झालेली. ती रडत होती घळाघळा, पैंजण तुटली म्हणून. खरतर जी पैंजण तुटलेली , तिच्या आईची आठवण होती त्यात... हे मला नंतर कळले.