*आयुष्याला सावरावे* एकदाची मिळते जीवन प्रयत्ने सार्थक तया करावे सत्य वाणी,उच्च विचारसरणी ठेवून या आयुष्याला सावरावे.. चाल योग्य मार्ग पत्करुनी कोणाशीही दुजाभाव न ठेवावे आपुलकीने जिंकत मने सर्वांची या आयुष्याला सावरावे... संकटं येताच जीवनी भिडण्या तया निर्भिडपणे तयार राहावे नम्रतेने विजयी होता या आयुष्याला सावरावे... एकच मुलमंत्र सर्वांनी मनोमनी ठरवावे दुखावे न कोणाचे मन मजकारणे सुखात सर्वांसम या आयुष्याला सावरावे... -विशाल पंडित © आयुष्याला सावरावे...