Dhanashree Kaje:
स्पर्श (कथा)
स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकु ही होते पण ते बाहेर गावी राहत असत . स्वप्ना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आज काल स्वप्ना खुप अस्वस्थ राहत होती . स्वप्नच कशातच मन रमत न्हवत स्वप्ना तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर ही खेळायला जात न्हवती सुट्टीच नाव काढताच आनंदुन जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवेली झालेली होती . तिचा रडवेला चेहरा चित्राला (स्वप्नाची आई ) पहावंला नाही . तिने स्वप्नाला जवळ घेत उदासेपणाच कारण विचारल . "बाळ काय झालय तुला ? पहिले सुट्ट्या म्हणल की किती खुश असायचीस तु मग आता अस काय झालय शोना ? तु काही खात नाहीस पीत नाहीस सारखी उदास असतेस कुणाशी बोलत देखील नाहीस " चित्रा स्वप्नाची समजूत काढातच असते तेवढ्यात स्वप्ना भानावर येते आणि काहीही उत्तर न देता तिथुन निघुन जाते .
चित्राच मन हळहळत ती विचार करत बसते . काही वेळानंतर चित्राला स्वप्नाच्या एका टिचरची आठवण होते चित्रा संध्याला फोन करून घडलेला प्रकार सांगते आणि तिला घरी बोलाऊन घेते . संध्या स्वप्नाची फक्त एक टिचर नसते एक खूप चांगली मैत्रीण एक गुरु आणि एक ताई असते. संध्या स्वप्नाच्या खोलीत जाते आणि प्रेमाने स्वप्नाला आवाज देते. संध्याचा आवाज ऐकताच स्वप्ना हुंदके द्यायला लागते. संध्याला काय बोलाव हेच कळत नाही . काही वेळानंतर संध्या स्वप्नाला शांत करत फक्त एवढच बोलते . "बाळ जे काही तुझ्या मनात चालु आहे आज सगळ सांग मला आपल्या मनात काहीच ठेवु नकोस आपल मन मोकळ कर पिल्लु" स्वप्ना एकक्षण आपल्या आईकडे बघते ते बघुन चित्रा दोघांना एकट सोडुन तिथुन निघुन जाते .
इकडे ... स्वप्ना संध्याला सगळ सांगायला सुरुवात करते काही वेळानंतर स्वप्नाच ते भयानक सत्य ऐकुन संध्याच मन हेलावत तिच्या डोळ्यात पाणी येत आपले डोळे पुसत संध्या स्वप्नाला हळुच जवळ घेते आणि प्रेमाने तिचे डोळे पुसते . काही वेळानंतर संध्या खोलीबाहेर येते आणि चित्राला आणि सारंगला (स्वप्नाचे बाबा ). सगळ सांगते " बर झाल तुम्ही मला बोलाऊन घेतलत खुप कोमेजून गेलीये पोर ." चित्रा संध्याला चिंतेत विचारते. "पण नेमक काय झालय तिला ? आम्ही इतके दिवस झाले विचारतोय पण ती काहीच बोलत नाही शेवटी न राहाऊन तुम्हाला बोलाऊन घेतल." संध्या त्यांना सांगते " बर झाल तुम्ही मला बोलावलत . मी जे ऐकल आहे ते खूप भयानक आहे . पण आता तुम्हाला खुप खंबीर व्हाव लागेल तेव्हाच तिला तुम्ही खंबीर बनवू शकाल तिला खूप खंबीर बनवा आणि तिला चांगल्या वाईट स्पर्शाच महत्व पटवुन द्या . स्वप्नानी सांगितल तिला चुकीच्या अर्थाने स्पर्श केला जातोय तुमच्याच कॉलनीतले माधवराव तिला घरी बोलावतात आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करतात तिला त्याचा खूप त्रास होतोय." हे ऐकून स्वप्नाचे आई बाबा हादरून जातात . काही वेळानंतर चित्रा स्वप्नाच्या खोलीत येऊन स्वप्नाला जवळ घेते . इकडे सारंग पोलिसांना घेऊन माधवकडे येतो आणि माधवला पोलिसांच्या हवाली करतो पोलिसांच्या मारामुळे माधव सगळ कबुल करतो .