Nojoto: Largest Storytelling Platform

#स्पेस... खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असल

 #स्पेस...

खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असली मंद हवा आणि त्यात खराब असलेला मुड,अजुनच नैराश्य येत होतं.ह्याच म्हणणं होत की भरल्या घरात नैराश्य यायला काय धाड भरलीये.कुठल्याही गोष्टीचा अतीच विचार करत रहातेस मग काय होणार...पण विचार हे काय माणुस मुद्दाम ठरवुन थोडीच करत रहातो.ते आपोआप येत रहातात,कितीही नाही म्हणलं तरीही...आँफिसचे टेंशन्स घरी नको असं काही वेगळं ठरवुन विचार करता येत असतात का?
कालच्या मिटिंगमधे त्यांनी शेवटी सांगितलंच...
"तुम्ही स्पेशल आहात म्हणुन तीन वेळेस बदली नाकारलीत.पण ह्या वेळेस तुम्हाला बदली घ्यावीच लागेल...कारण तुमच्या बढतीची पोस्ट इथे नाहिये..."
बदली घ्यायची सोपी नाहिये.हा यायला तयार होणार नाही.पण किती दिवस मग प्रमोशन नाकारणार ना आपण? तिला लग्न जमवतानाचे दिवस आठवले.
"चल ग सुमे...लवकर तयार हो...ती मंडळी अर्धा तासात पोहोचतील म्हणे,गजुचा निरोप होता..."राधाक्कांनी आवाज देऊन म्हणलं.
ती तयार झाली.म्हणल्यानुसार ती मंडळी आलीच.पोहे दिल्यानंतर रितसर दाखवण्याचा कार्यक्रम झाला.खरंतर पुण्यात हाँस्टेलवर राहुन नोकरी करत असलेल्या सुमीला हे असं दाखवणं पटत नव्हतं पण पर्याय नाही म्हणुन ती उभी होती.मुलगा पण बँकेत नोकरीला होता.मग काही जुजबी प्रश्न विचारले गेले.त्यात एकाही प्रश्ना वरुन सुमीची हुशारी कळत नव्हती.त्याने एकदोनदा ओझरत पाहिलं,तेव्हा नेमकं ती ही पहात होती म्हणुन दोघांची झाली ती तेवढीच नजरानजर.त्यामुळे जास्त काही ओळख न होता लग्न जमलं.बाकीचे व्यवहार ठरले.

sandyjournalist7382

sandy

New Creator