Nojoto: Largest Storytelling Platform

#भाकर मिळवण्या भाकर भुकेची इथे गाऱ्हानी किती सोसा

#भाकर
मिळवण्या भाकर भुकेची इथे
 गाऱ्हानी किती सोसावी,
भाकरीची किंमत घामाच्या
 थेंबा थेंबाने मोजावी..!!

चव भाकरीची कष्टाच्या झळा 
झेलनाऱ्यालाच  कळावी,
खाणाऱ्या जिभेने किंमत 
तिची ओळखावी..!!

पोट जरी हितभर,काम करी दिसभर
 खळगी मागेल तितकी खावी,
कांदा  नी भाकर मी भुकेचा चाकर 
भुकेची उजळनी शिकवावी..!!

भाकरीची ना चिंता मी मोठा तालेवार
 का तिची किंमत करावी,
पोटाला पडता पिळ भाकरिनेच
 तिची किंमत ठरवावी..!!

भाकरी देणारी माझी काळी आई
कष्ट तिचे ठाई ठाई भुकेलाच 
तिची चव कळावी..!
सुत शेतकरी तिचा न्याहरीला 
खावून चटनी भाकरी,
उरलेल्या भुकेचा प्रश्न तुमचा
 आमचा जगी तोच सोडवी..!!

कवियित्री-शोभा डी निकम #भाकर
#भाकर
मिळवण्या भाकर भुकेची इथे
 गाऱ्हानी किती सोसावी,
भाकरीची किंमत घामाच्या
 थेंबा थेंबाने मोजावी..!!

चव भाकरीची कष्टाच्या झळा 
झेलनाऱ्यालाच  कळावी,
खाणाऱ्या जिभेने किंमत 
तिची ओळखावी..!!

पोट जरी हितभर,काम करी दिसभर
 खळगी मागेल तितकी खावी,
कांदा  नी भाकर मी भुकेचा चाकर 
भुकेची उजळनी शिकवावी..!!

भाकरीची ना चिंता मी मोठा तालेवार
 का तिची किंमत करावी,
पोटाला पडता पिळ भाकरिनेच
 तिची किंमत ठरवावी..!!

भाकरी देणारी माझी काळी आई
कष्ट तिचे ठाई ठाई भुकेलाच 
तिची चव कळावी..!
सुत शेतकरी तिचा न्याहरीला 
खावून चटनी भाकरी,
उरलेल्या भुकेचा प्रश्न तुमचा
 आमचा जगी तोच सोडवी..!!

कवियित्री-शोभा डी निकम #भाकर