*तत्वज्ञान सार।आयुष्याचे सोपे।* *उपकारा तापे।तोची धन्य।* *दुःखाला फुंकर।मायेची झालर।* *दुबळ्याला धीर।होय खरा।* *भुकेलेल्या घास।तहानेल्या नीर।* *रहावे खंबीर।सत्यमार्गी।* *साऱ्यांप्रती मनीं।जपा प्रेमभाव।* *किल्मिषाचे डाव।उलथावे।* *काम, क्रोध रिपू।जाळावे अंतरी।* *निर्मळ उदरी।गंगाजळे।* *कष्टाची भाकरी।नको लाचखोरी।* *असावी पदरी।रूपे चार।* *मृदू वाचा मुखी।नीतं नम्र वदे।* *पावन ती पदे।त्रैलोक्यात।* *निरवावे मनं।सज्जनाची खूण।* *आपला तो जाण। म्हणा सदा।* *भंगुर जीवनी।शाश्वत हे सुखं।* *उल्हासित मुख।स्वकारणे।* *रीते हाती आलो।रितेच जायचे।* *कस्तुरी गंधाचे ।प्रेम ठसे।* ©Shankar kamble #अभंग #संत #रचना #अभंगगाथा #अभंगवाणी #Butterfly