गोष्ट 'ती' ची घराला घरपण ती हृदयातील आपलेपण ती आजारपणात रामबाण औषध ती घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर ती अवघड प्रवासातील साथ ती वाळवंटातील वाट ती आनंददायी पहाट ती वेदनेवर फुंकर ती दुःखांचा विराम ती संसाररूपी गाडीचे चाक ती घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा बाक ती अपत्यांसाठी आनंदाची बाग ती पाहूनचारासाठी लगबग ती खर्चातील काटकसर ती पसाऱ्यातील व्यवस्तीतपणा ती कुटुंबासाठी कायम हजर ती स्वतःसाठी वेळ नसलेली ती इतरांसाठी वेळच-वेळ ती कायम कष्टच करणारी कष्टकरी ती भुकेल्यांसाठी अन्नपूर्णब्रह्म ती अंतराळ वीरांगनांची कल्पना ती असुरांसासाठी माँ काली ती राज्य रक्षणासाठी राणी झाशी ती स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ ती गोष्ट ती ची