गुर्जर कविता साहित्य मंचात समाविष्ट केले त्यात आनंद वसे | समाजाची सदैव ऋणी नवनवीन कार्यक्रम दिसे || मनी माझ्या शब्दांचा पुष्पगुच्छ | सर्व कवींना काव्यरेखातून आभाराचे देते काव्यगुच्छ || तुझा प्रत्येक शब्द वाचनीय लेखनी | तू कवीच्या आयुष्यात पुष्प देखणी || मनात माझ्या लेखनीचे समाजासाठी सूर दाटले | ब-याच दिवसानंतर लेखणीचे मन सरसावले || भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला | हाती घेत शस्त्र लेखणी , मनातील आभार काव्यभाव सांगितला || तू माझ्या आयुष्यात जगण्याचं साधन बनली| भावनांचे गाठोडे व्यक्त करण्यासाठी लेखनी शस्त्र बनली || मी लेखणीला फक्त मनाचे भाव सांगितले | मनातल्या विचारांसह आभाराचे काव्यांकूर जन्मले|| मनातल्या विचारांचे, लेखनीच्या जोडणीने फुलले | गुर्जर कवींचा मंच पाहून काव्यपुष्प उमलले || ✍️- (स्वलिखित )- शितल कैलास गुर्जर ✍️ 😊✍️माझ्या लेखणीचा गंध थेट समाजात पोहोचले भरभरून कौतुक केले. त्यासमूहासाठी ही कविता 😊🙏 माझे समूहात आपण स्वागत केले... आभार न मानता ऋणातच राहू इच्छिते...ऋणानुबंधाचे धागे घट्ट करू इच्छिते... 👏👏 #समाज #लेखनी #प्रयत्न #व्यासपीठ