Nojoto: Largest Storytelling Platform

आभासी खिडकीतून डोकावताना.. आभासी खिडकीतून डोकावतान

आभासी खिडकीतून डोकावताना..
आभासी खिडकीतून डोकावताना
डोळे हरखून जातात तिसरे जग पाहताना
मग आपण हळूहळू गुंतत जातो;
त्यातले खरे-खोटे समजून घेताना.

दुसऱ्यांच्या चांगल्या-वाईटाच्या शोधात
आपण स्वतः मात्र हरवत जातो.
आभासी जगातल्यांचे अंधानुकरण करताना
आपण आपले वेगळेपण विसरत असतो.

आभासी लोक चांगुलपणाचा 
फसवा वैश्विक बाजार मांडतात.
साधी भोळी लोकं त्यांची गिऱ्हाईकं होऊन
उगाच त्यांचा उदोउदो करत सुटतात.

भुरळ घालणारे अनेक धूर्त मुखवटे
तुम्हाला येथे भेटतील.
नकळत कार्यभाग साधला की,
तुम्हाला खिडकीत ताटकळत ठेऊन जातील.

वेळ कसा निघून जातो हे कळत नाही;
खिडकीततुन अनेक वाटा धुंडाळताना.
वास्तव काही हाती लागत नाही;
आभासी जग सैरभैर हिंडताना.

आभासी खिडकीतून डोकावण्याआधी
स्वतःच्या अंतरंगात डोकावलं पाहिजे.
जवळच्या माणसांचं मोल जाणून
खिडकीपासून शक्य जितकं दूर राहील पाहिजे.
 #आभासी खिडकीतून डोकावताना.....
आभासी खिडकीतून डोकावताना..
आभासी खिडकीतून डोकावताना
डोळे हरखून जातात तिसरे जग पाहताना
मग आपण हळूहळू गुंतत जातो;
त्यातले खरे-खोटे समजून घेताना.

दुसऱ्यांच्या चांगल्या-वाईटाच्या शोधात
आपण स्वतः मात्र हरवत जातो.
आभासी जगातल्यांचे अंधानुकरण करताना
आपण आपले वेगळेपण विसरत असतो.

आभासी लोक चांगुलपणाचा 
फसवा वैश्विक बाजार मांडतात.
साधी भोळी लोकं त्यांची गिऱ्हाईकं होऊन
उगाच त्यांचा उदोउदो करत सुटतात.

भुरळ घालणारे अनेक धूर्त मुखवटे
तुम्हाला येथे भेटतील.
नकळत कार्यभाग साधला की,
तुम्हाला खिडकीत ताटकळत ठेऊन जातील.

वेळ कसा निघून जातो हे कळत नाही;
खिडकीततुन अनेक वाटा धुंडाळताना.
वास्तव काही हाती लागत नाही;
आभासी जग सैरभैर हिंडताना.

आभासी खिडकीतून डोकावण्याआधी
स्वतःच्या अंतरंगात डोकावलं पाहिजे.
जवळच्या माणसांचं मोल जाणून
खिडकीपासून शक्य जितकं दूर राहील पाहिजे.
 #आभासी खिडकीतून डोकावताना.....