Nojoto: Largest Storytelling Platform

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं

अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...
पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल...
मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं...
तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला...
पण खरं सांगू...
नाही वाटत मला रे...
तुला माहिती आहे...
अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे...
मला वाकोल्या दाखवत..
मला चिडवत...
हो...
नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल...
मला ते अधर निर्व्यसनी हवेत ...
मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत...
जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात...
गोड गुपित आहे हे माझे...
असो...
मी अशीच आहे रे...
नाही म्हणजे नाहीचं...
राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच....
ए ऐक ना....
तू तो माझा श्वास होशील का...
अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का...
नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित...
आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ...
आलास तर....
पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला...
अगदी निखालस......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार... सौभाग्याच्या सीमेशिवाय... #कविता

189 Views