पाऊले डगमगली की आधार तुमचा मिळतो मनी भीती दाटली की कुशीत तुमच्या निजतो कौतुकाचा वर्षाव झाला तरी तुमच्या शब्बासकी साठी आतुरतो तुमच्या चेहर्यावर हर्ष पाहून आम्ही मात्र आनंदाने बहरतो चुकले-माखले तर ओरडता तूम्ही डोळ्यातील पाणी अलगद पुसतात तुम्ही गोड-गोड चॉकलेटचा लळा तुम्ही लावतात कधी-कधी चुकीच्या हट्टा पायी चापट तुम्ही मारतात कधी कणखर तुम्ही तर कधी प्रेमाचा झरा तुम्ही तुम्हाला समजून घेणे आहे कठीण देवाला समजण्यासाठी देवपण आणू आम्ही कोठून!!! मनातील भावना