शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा, खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा. आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे, तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे. इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही, आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही. हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत, जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत. जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय, पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय. सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय, पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही कमी होताना बघतोय. आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते, दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.