शांततेचा वापर हा नेहमीच केला जातो जेव्हा कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनसथितीत नसतात. त्यांचं असं असतं की आपण जे काही बोलतो तेच खरे आणि तेच योग्य आहे. असे विनाकारण कुणाचं ही ऐकू न घेणाऱ्या लोकांसमोर कधी कधी काहीही चूक नसताना माघार घ्यावी लागते जेणे करून त्यांची वायफळ बडबड बंद तरी होईल पण ह्या अशा लोकांचं वागणं खूपच विचित्र असतं,आपल्या शांततेला हे लोकं चूक मान्य करणे असे समजतात. उलट म्हणतात हे असं आहे चूक समजली की बरोबर शांत बसतात,अरे ह्यांना कसं समजत नाही,तुमच्या विरोधात कित्येक लोकं असतात पण तुम्ही त्या सर्व लोकांना खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असतात म्हणून ते लोकं असे विचार करतात की अशा मुर्खांच्या नादी लागण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं... ह्या अशा लोकांसाठी का होईना जर शांतता एक शस्त्र असते तर किती बरे झाले असते,त्यांच्या मनमानी पणाला आणि कुणाचे ही न ऐकण्याच्या वृत्तीपुढे हे शांतता शस्त्र कामी आले असते निदान त्यांची बोलती तरी बंद झाली असती. मित्रानों💕 शुभ प्रभात काय चाललयं? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय काय असेल याबद्दल तुम्ही विचार करता का? विचारांच्या जाळ्यात तुम्ही कधी अडकले असतांना तुम्ही कधी विचार केला का, कि जर शांतता एक शस्त्र असते तर तुम्ही काय केल असतं? त्याचा कसा वापर केला असता किंवा कधी वापरलं असतं. चला तर मग आजचा विषय हाच आहे