तिने विचारलं, प्रेम म्हणजे काय ? मी म्हणालो, आकाशात असलेल्या चंद्राला बघून, ज्याची आठवण यावी, ते प्रेम... मग तिने विचारलं, आठवण म्हणजे काय ? मी म्हणालो, कशी ही असली परिस्तिथी, तरीही सोबत असते , ती आठवण... ती हसली आणि म्हणाली, जर आठवणी ने माणूस सोबत असतो, तर आपण वाट का पाहतो ? आणि वाट म्हणजे काय? मी म्हणालो, जसं आपण चित्रपटात आपल्या आवडत्या पात्राची कलाकारी बघायला पूर्ण चित्रपट पाहतो, तसंच आपल्या जीवनाच्या ही चित्रपटात एक पात्र असं असतं, ज्याची वाट आपण नेहमी बघत असतो.... मग ती म्हणाली, तुझ्या जीवनाच्या चित्रपटात माझी जागा कुठे ? मी म्हणालो "हृदयात", पण मनातल्या मनात.... ©Ajay Chaurasiya #ती