आत्या ही जरी आपल्या बाबांची बहीण असली तरी प्रत्येक भाचीची ती दुसरी आईच असते. कधी तरी कोण तरी एकदा तरी तुम्हाला असे नक्कीच म्हणते,.. अग तुझ्यात तुझ्या आत्याची झलक दिसते. कधी तुमचे हसू तिच्या सारखे असते, तर कधी तिच्या गालावरची खळी तुमच्या हसूत खुलते लहान असता जेव्हा तुम्ही.. तेव्हा जास्त माया तर तीच तुम्हावर करते.. सासरी गेलेल्या भाचीची नित्य खुशाली घेत रहाते दूर असली तुमच्या पासून तरी तुमची ही काळजी करत असते. प्रत्येक भाचीच्या हृदयामध्ये तिच्या आत्याची खास अशी एक जागा असते. कारण तिच्या आत्याची छबी तिच्यात असतेच असते. ती पण आपल्या लाडक्या भाचीची... एक छान मैत्रीण असते. .. आत्या #सर्वांची एक छान मैत्रीण असते.