खूप वाटतं.. थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना.. रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना.. भिरभिरणाऱ्या पावलांना.. उदास खिन्न मनाला.. कधीतरी.. खूप वाटतं.. करावं मोकळं कोंडलेल्या मनाला.. करावेत व्यक्त कुणाजवळ तरी, उफाळून आलेले भावनांचे कढ... पण कुठेतरी मनाला, काहीतरी डाचत राहतं. नेहमीप्रमाणे डोळ्यातून.. पाणी मात्र वाहत जातं.. त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" माझ्या अंतरंगात भिनलेली, नसानसात सामावलेली, खोल खोलपर्यंत... ©अर्चू... #खूप वाटतं..