Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा गेलो होतो एका कवी संमेलनात घुसमट झाली माझ्या

एकदा गेलो होतो एका कवी संमेलनात 
घुसमट झाली माझ्या विचारात।।धृ।।
भावनांचा  कोण मांडे कडीपत्ता
विचारांचा नव्हता कुठे थांगपत्ता
विवेकशुन्य भाषेचा दांडपट्टा
परीक्षक होते निगरगटा।।१।।
आयोजकाची रंगली सुपारी
कवींची टोळी आली दुपारी
काव्याची  नुसती हमरातुमरी
रचना मांडल्या बाजारी।।२।।
कवितेचे विषय वेश्या तमाश्या
चारोल्यांच्या घोंगावल्या माश्या 
वेचलेल्या उम्रट भाषा
कवितेत पारंपरिक दशा।।३।। काल्पनिक कविता
एकदा गेलो होतो एका कवी संमेलनात 
घुसमट झाली माझ्या विचारात।।धृ।।
भावनांचा  कोण मांडे कडीपत्ता
विचारांचा नव्हता कुठे थांगपत्ता
विवेकशुन्य भाषेचा दांडपट्टा
परीक्षक होते निगरगटा।।१।।
आयोजकाची रंगली सुपारी
कवींची टोळी आली दुपारी
काव्याची  नुसती हमरातुमरी
रचना मांडल्या बाजारी।।२।।
कवितेचे विषय वेश्या तमाश्या
चारोल्यांच्या घोंगावल्या माश्या 
वेचलेल्या उम्रट भाषा
कवितेत पारंपरिक दशा।।३।। काल्पनिक कविता