कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले हा प्रकार झाला कंटाळवाणा ।। टीव्ही च्या सिरीयली संपल्या बसून सोप्याच्या गाद्या दबल्या घराच्या बाहेर बी निघता येईना ।। घरातल्या घरात कस जगायचे मित्राना सोडून कसे राहायचे चार मित्रांना एकत्र बसता येईना।। तू हे लॉकडाऊन लावले व्यवसाय सारे आमुचे बुडाले कधी संपणार ह्या नरकयातना ।। करतो विनंती हात जोडुनी जारे बा कोरोना तू निघूनी येऊ नको परत आम्हच्याकडे पुन्हा।। कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले