लढण्यासाठी⚔⚔⚔⚔⚔ चला आता उठा बोलवा त्या कित्येक काळपुरुषांना उठवा त्या गाडलेल्या मुडद्याना पेटवा ती स्मशाने पुन्हा मशाली पेटवण्यासाठी चालायला लागा हातात मशाली घेऊन समोरचा सूर्य उगवण्याची वाट बघू नका काळ्या रात्रीच्या थोड्या लाचने तोही गद्दार झालाय तुमचा आमचा दिवस रात्रीत बदलण्यासाठी कफने बांधा डोक्याला घ्या हातात एखादा वाळका सोटा नसतील पादत्राणे तर चला नागवेच अंधारातल्या प्रकाशवाटा शोधण्यासाठी मारा लाथ त्या मुर्दाड जमिनीला पाणी काढण्यासाठी उभा वाराच गीळा गटागटा भूक भागवण्यासाठी द्या एकदाची काळ्या खडकावर ताणून आराम करण्यासाठी अन बाभळीला बांधलेला फाशीचा दोर घ्या आता खांद्यावर क्षितिजाचा कडा चढण्यासाठी पुन्हा एकदा आक्रंदत लढण्यासाठी