बरेचदा आपण एखाद्याची स्थिती बघून त्याच्याविषयी नको ते विचार करायला लागतो. तो काय करतो, कसं करतो, कशाला करतो अश्या फालतू आणि निरर्थक बाबीकडे विशेष लक्ष देत फिरतो. ह्या धर्तीवर सगळे आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ज्याचं त्यालाच माहित असतं. तो कसं दिवस काढतो ते. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. म्हणून कुणावरही हसण्याआधी, बोट उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. कारण, कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही आघात घडतात की, अवघ जीवन बदलून जाते. आणि प्रत्येकाच्या जीवनात असे काही गूढ असतात की, तो कुणाला सांगत नाही. बरेच लोकं समोर हसतात पण डोळ्यातून निघणारे अश्रू लपवतात. माणूस परिस्थिती पुढे हतबल होतो. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे तितकी सत्य नसते. म्हणून कोणालाही काहीपण बोलण्याआधी खरंच विचार करून बोला. तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो. (प्रीत )