जोडी.. तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे.. एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे... इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही.. एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे.. माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे... शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही.. तुझ्याविना माझी नजर, सार्या जगी केवळ अनर्थ पाही.. Vishaaal/Aadinaath 19-07-21 ©Vishal Chavan #जोडी