तिचेच पुढे जायचे आहे आणखी समोर- समोर, काही पाय ओढते तर कोणी लावतात जोर, करू जर यांच्यावर युगाचा विचार प्राचीन ते आले आधुनिकतेवर, होते आधी चालू आहे अजून का नाही झाला बदल तिच्यावर, पार सगळे कर्तव्य पाडून सांभाळते काम जोपासते घर, थकवा न कधी नित्य असते कामात गोडवा जिभेत, गती पायात, गारवा डोक्यावर, उपहास का करतो काय कमी तिच्यात अडाणी असली तरीही जिद्द भरपूर, उपहास का तिचा, आहे का ती विशेष सर्वनाम बघून बिचारी, असहाय्य आणि लाचार, सन्मान हिरवण्यासाठी हात टपलेत कित्येक तरीही करिते त्यांचा अचूक प्रतिकार, विकत घेऊ पाहतात तिचे तन आणि मन जशी छापली जाते किंमत बाजारातल्या वस्तूवर, आला समान हक्काचा आता कायदा अंमलात आहे मिळत तिला तिचे अधिकार, साजरा आम्ही करितो 8 मार्च महिला दिन असते का हया दिवसाची हर स्त्री ला खबर, टिकण्यासाठी खंबीरपणे या समाजात घ्यावे समजून लागणार स्त्रीला तिचेच विचार.... ©Lina 8 मार्च महिला दिवस विशेष रचना....