अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेवला होता. कालच upsc चा रिजल्ट आलेला आणि आपली नितु IPS झाली होती. नितु खिडकीतुन बाहेर बघत बसली होती. हळुच अजयने मागुन येवुन तीला मिठी मारली आणि हळुच कानात पुटपुटला, " Thanks " तीने वळुन त्याच्या कडे बघितले. तिचे डोळे भरून आले आले, तिच्या मनातील घालमेल त्यालाही समजली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याने नेहमीच वाक्य म्हणलं " मी आहे ना! " आणि ती गोड हसली.