*विषय:-का कुणास ठाऊक देवा* ********************* का कुणास ठाऊक देवा.? नेहमी वेगळंच घडत, काम प्रामाणिक केलं तरी त्यात विघ्नच येत. का कुणास ठाऊक देवा? एखाद्यावर किती प्रेम केलं, तरी त्याच उत्तर त्यानं विश्वासघात देऊन दिल. का कुणास ठाऊक देवा? आज कोणाचा कोणावर, विश्वास नाही उरला आता प्रत्येकवेळी फुटते ते खापर. का कुणास ठाऊक देवा? म्हणून हा कोरोना आला, मुसक्या बांधून माणसांना आज फुटा फुटावर बसवला. का कुणास ठाऊक देवा? आज देव देवळात नाही, मनाच्या आर्त गाभाऱ्यात माणुसकीचा भाव पाही. ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke काय झाले देवा