Nojoto: Largest Storytelling Platform

गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल

गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे वाळत घालायला खिडकीपाशी आले.बादली ठेवली, धुतलेला एक कुर्ता हातात घेताच आई म्हणाली,"पोरी नीट झटक गं कपडे".

मी आईला विचारलं,"आई कपडे का झटकायचे ?" 
आई म्हणाली ,"कपडे धुतल्यावर ते स्वच्छ होतातच पण दिवसभर तू कामानिमित्त भटकतेस, बऱ्याच माणसांना भेटतेस तेव्हा काही सकारात्मकतेचे आणि नकारात्मकतेचे कण तुझ्या कपड्यांमध्ये अलगद शोषून घेतले जातात, कपडे झटकले की हे नकारात्मकतेचे कण तुझ्या कपड्यांमधून भुर्रर्र होतात.उरतात ते फक्त सकारत्मकतेचे कण हलक्याफुलक्या उन्हाने वाळले जातात, जे आपल्या हातून सत्कर्म घडवून आणतात.तसंच अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही  सहजपणे शक्य होऊन जातात..."
--प्रेरणा

#blogger #yqtaai #thoughts #yqdidi #yqdiary #yqwriters #yqbaba