°गुढी पाडवा° वसंतागमनी, पहाट ती झाली ll चैतन्याची लाली, पसरली ll काठीवरी लोटा, ठेऊनी उपडा ll आणिक कपडा, बांधूनिया ll कडुनिंब डाळी, फुलहार गाठी शृंगारली काठी, उर्ध्व दिशी ll हळदी नि कुंकू, गंधाक्षदा लेप पूजन संकल्प, मनोभावे ll बंधू भाव प्रेम, समता नि एकी नांदो भुवलोकी, समाधाने ll सुख नि समृद्धी, यश आणि कीर्ती अशी ही आरती, गातो आज ll चैत्र प्रतिपदा, आला हा पाडवा ll घेऊनी गोडवा, घरोघरी ll पूर्ण होवो सारी, आपुली ती इच्छा प्रार्थतो सदिच्छा, आज दिनी ll ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav गुढी पाडवा शुभेच्छा