दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद. थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी, तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी. जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक, तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.