White हे कर्ज त्याचे एवढे फेडाल कोठे मिळतो असा फुकटात अस्सल माल कोठे इकडे उभी आधीच टोळी लांडग्यांची तिकडून आला वाघ तर धावाल कोठे आत्ताच कापा पंख जर कापायचे तर पक्षी उडाल्यावर सुरा फिरवाल कोठे मोठीच पंचाईत झाली ऐन वेळी तलवार दिसली पण दिसेना ढाल कोठे नाही कळाला अजुनही धोका तुम्हाला रस्ते अजुन झालेत तुमचे लाल कोठे आनंद झाला आज आल्यावर तुम्ही पण इतकेच सांगा सर्व होता काल कोठे घेऊन मी आलोच नाथा एक श्रीफळ तोवर पहा तू भेटते का शाल कोठे एकनाथ ©Eknath Dhanke #save_tiger