ती.. हरवले आहे आज तिचे मन कोणास ठाऊक काय आहे त्याच कारण ना चेहऱ्यावर भाव ना विचारांचा ठाव कशाचा झालाय नेमका हृदयावर घाव मधूनच पडतोय नेत्राचा कटाक्ष अजाणतेपणी देतोय कशाची तरी साक्ष भरकटलेल्या मनाला लागलेली ही आस श्वासाश्वासात दडलेला हा नवीनच ध्यास देतोय कुणाच्या तरी असण्याचा आभास भावनेच्या सागराला लागलेली ही ओढ शोधतेय कुणाच्या अस्तित्वाचे गुढ संपणार तरी कधी ही विचारांची गुंतागुंत की तो अफाट सागर विसरलाय स्वतः चाच अंत मनी हीच अभिलाषा सुटावे कधी तरी हे कोडे बहरावा विचारांचा वसंत ऋतू असाच आणि जगावे हे आयुष्य ह्याच विचारांसह रोज थोडे थोडे आता समीप आलीय ती चांदणी निशा जेव्हा दिसेल ती मनातली धूसर प्रतिमा.. - प्रतिमा