आता सगळ्यांनाच ठाऊक आहे महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर सगळे पाहुणे, स्मार्ट झालेत मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे... मायेची नाती कोरडी होऊ लागली ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले टिपणार कोणी नाही ..... सगळ्यांनाच ठाऊक आहे एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही ट्रॅफिकमध्ये फिरतो अचानक एखादी गाडी आलीच समोर तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही सगळ्यांनाच ठाऊक आहे महागातला महाग पदार्थ आम्ही ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो पण घराबाहेरील ओट्यावर बसून आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास गोष्टींपुरताच राहिला आहे... हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे म्हणजे काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही.... - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#