*दोन घडीचा रे डाव* *सारे सोंग हे बेगडी* *नको करू गर्व वेड्या* *खोल डोळ्यांच्या झापडी* *रंगपट आयुष्याचा* *जड झाले मुखवटे* *खोल मनाच्या तळाशी* *दुःख रडते एकटे* *खांद्यावरी नको भार* *ज्याने - त्याने सोसायचे* *माप भरले भोगाचे* *त्यागातून लोटायचे* *मोह ,माया मृगजळ* *सुख चांदणं चकवा* *हाती येता विझताती* *येई ' मी ' पणा थकवा* *तुझ्यातल्या माणसाला* *हाक देई मनातून* *भेट तुलाच नव्याने* *साद येईल आतून* *गर्व ,अभिमान सारा* *मेणापरी ओघळावा* *द्वेष मळभ सारुनी* *लख्ख प्रकाश झेलावा* ©Shankar Kamble #मुखवटे #मुखवटे #मन #तू #जीवन #जीवनअनुभव #सत्य #गर्व #mask