आला आला पावसाळा काळे ढंग लागले रडायला रस्त्याला पाणी लागले जमायला लोकं लागले आनंदाने भिजायला....! शेतकरी मनातून लागला हसायला पेरणीची तयारी लागला करायला सुजलाम सुफलाम लागला बघायला....! गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला वादळं वारा फटका बसलाय देईला....! सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....! आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला उदयाची सावली नको वाटती का कुणाला फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....! शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला पावसामुळे आजारी नको वाटतं पडायला..... आला आला पावसाळा कधीं संपला उन्हाळा सुरू झाला पावसाळा.....! उमेश साळुंके पिंपरी गावं १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा