जळतोय मराठवाडा तळपतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा तळपतोय मराठवाडा ना विकास या भागाकडे पाहतो ना पाणी ना पाऊस अशा भेदात मरतोय मराठवाडा निसर्गानेही अत्याचार केला त्याने तर हुल द्यायची सवय लावून घेतली हा भाग म्हणजे इकडचा तिकडचा इथे कधी पाण्याला विरोध तर कधी विकासाला विरोध इथे वाद रंगतात फक्त हिंदू मुस्लिम आमचं भगवा तुमचं हिरवं याच दलदलीत बरबटलेल्या विचारात फसलाय मराठवाडा कधी शहराच्या नावावरून तर कधी इतिहासाने बदनाम दाखवून देताय मराठवाडा इथे कधी जाळपोळ दिसते तर कधीतरी वाद उफाळून दिसतो निसर्गसुद्धा परीक्षा घेतो असा हा मराठवाडा ना गाव पण राहिले ना पाखरु इथ फिरताय दिसतोय तो फक्त शुकशुकाट या बरबटलेला राजकारणाच्या अट्टाहसात फसलाय मराठवाडा कोणी म्हणतो विदर्भ आमचं कोणी म्हणता पश्चिम महाराष्ट्र आमच त्या भांडणाच्या विकासात आमचा मराठवाडा पडला खितपतखितपत!! ना चांगला राजकारणी ना चांगले नेतृत्व ज्याला त्याला पडले आपलीच काळजी आणि आपली हौस मौस!! शेवटी काय हो तळपतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा - विशाल मगर #maharashtra #ranchopatil #marathi #kavita #poem #vmpoem #marthiqoutes