मानावेसे तुजला हे कृष्णा अन् पंचगंगा दाखविलीसी माणसाला त्याची जागा.... लयं मातला हा सारा माणूस जाती-जातीत वाटला.. केली असेल त्याने प्रगती नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला.. देवाने माणसाला धर्मात वाटून द्यावे.. काय तुझी कमाल आज साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे.... देवाला न कधी जमले ते ना कधी त्याला जमणार.. तुझ्या पाण्याचा प्रवाहाने माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे.... तुला ह्या पावसाचे तांडव करणं गरजेचं होतं.. त्यामुळेच तर जाती-धर्म एकत्र तुला करणं होतं.... जेव्हा जेव्हा या भूतलावर माणसे जातीमध्ये वाटले जातील.. मला वाटते तेव्हा तेव्हा तू त्यांना त्यांची दया दाखवशील .... कृष्णा माये आज कोल्हापूर पाण्यात मात्र आहे.. बकरी ईद अन् गणपती पूजा पण दस्तावले आहे.... नको देऊ हे सणासुदीचे क्षणीकचं सुख;.. दे आम्हाला वाटून माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर