Nojoto: Largest Storytelling Platform

तू मनात असूनही का एवढी दूर आहे.. याचाच त्रास मला आ

तू मनात असूनही का एवढी दूर आहे..
याचाच त्रास मला आज होतो आहे..

आसवांद्वारे ते व्यक्त करण्याचा,
या डोळ्यांचा ही बेत आहे..
तरीही पापण्यांद्वारे त्यांना,
अडवून मी ठेवत आहे..

पण कधीतरी बांध मनाचा फुटतो आहे..
मग नकळत अश्रूंचे अनावरण होत आहे..

तरीही येशील तू केव्हातरी अशी,
मनाची समजूत मी काढतो आहे..
तुझ्या आठवणींच्या ओझ्याखाली,
रोज क्षण क्षण मी मरतो आहे..
तरीही कधीतरी होईल मग आपलेही मिलन,
याच आशेवर मी आजवर जगतो आहे..

विरह आता सहन मला नाही होतो आहे..
आपल्या मिलनाची वाट मी बघतो आहे..
तू मनात असूनही का एवढी दूर आहे..
याचाच त्रास मला आज होतो आहे..

आसवांद्वारे ते व्यक्त करण्याचा,
या डोळ्यांचा ही बेत आहे..
तरीही पापण्यांद्वारे त्यांना,
अडवून मी ठेवत आहे..

पण कधीतरी बांध मनाचा फुटतो आहे..
मग नकळत अश्रूंचे अनावरण होत आहे..

तरीही येशील तू केव्हातरी अशी,
मनाची समजूत मी काढतो आहे..
तुझ्या आठवणींच्या ओझ्याखाली,
रोज क्षण क्षण मी मरतो आहे..
तरीही कधीतरी होईल मग आपलेही मिलन,
याच आशेवर मी आजवर जगतो आहे..

विरह आता सहन मला नाही होतो आहे..
आपल्या मिलनाची वाट मी बघतो आहे..